सामाजिक समतेच्या मार्गे तलाव जीविधा संवर्धन
शालू कोल्हे
०४ जून २०२०
शालू कोल्हे ही भंडाऱ्यातल्या नवेगाव बांध गावातली ढीवर समाजातल्या एका सामान्य परिवारातली तरूण महिला. बारावीपर्यंत शिकलेली म्हणजे ढीवर समाजाच्या मानाने बऱ्यापैकी शिकलेली. शिक्षणातून आलेल्या सामाजिक जागरूकतेतून तिच्या समाजाला अन्य समाजांकडून मिळणाऱ्या विषमतापूर्ण वागणुकीची तिला जाणीव झाली. ढीवर समाजातल्या महिलांना योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी मार्ग शोधत असता ती ‘भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ…